breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर, नियमावलींसह पाळणाघरंही सुरु करण्याची परवानगी…

लॉकडाऊनचे बरेच नियम शिथिल करण्यात आले आहे…यात आता महापालिकेने पाळणाघरे सुरू करण्यास परवानागी दिली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्या आई-बाबांच्या दृष्टीने हा निर्णय मदतगार ठरला असला तरी सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता मुले पाळणाघरात सुरक्षित राहतील का ? या बाबत पालक नक्कीच हा पर्याय निवडतीलच असं नाही…त्यासाठी पालकांना वाटणारी भीती दूर करण्यासाठी पाळणाघरांनीही आता ‘न्यू नॉर्मल’ संकल्पना आत्मसात करून नवीन नियमावली केली आहे.

लॉकडाऊनमुळे पाळणाघरे अडीच महिने बंद होती. या काळात घरून काम करणाऱ्या पालकांची मुलांना सांभाळताना तारांबळ उडाली. आता पाळणाघरे सुरू करण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाळणाघर चालकांनी स्वतःच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स तयार केल्या आहेत. यात प्रामुख्याने पाळणाघराच्या जागेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांसाठी नियम, पालकांसाठी नियम, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर पाळून जेवण आणि खेळांचे नियोजन याचा विचार करण्यात आला आहे.

kids playing with number puzzle, education concept

मुलांना सोडण्यासाठी येताना पालकांनी खासगी वाहतुकीचा वापर करावा, मुलांना शक्यतो दररोज आई अथवा वडिलांनीच सोडायला-आणायला जावे, पालकांनी मुलांबरोबरच पुरसे कपडे आणि रुमाल पाठवावेत, एक वर्षाखालील मुलांनी त्यांची स्वतःची खेळणी आणावीत, सर्दी, ताप, खोकला असलेल्या मुलांना पाळणाघरात पाठवू नये आणि मुलांच्या आजारपणाबद्दल पालकांनी जागरुक राहावे यांसारखे नियम पालकांसाठी करण्यात आले असून, पाळणाघरात मुलांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचे नियम ठरवून घेतले आहेत.

प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांचे तापमान तपासून, दारातच हातपाय स्वच्छ धुवून, काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी कपडे बदलावेत, अशा नियमांसह पाळणाघरात अॅप्रन, मास्क, केसांना जाळी वापरणे, एक वर्षाखालील मुलांना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हँडग्लोव्हज घालणे, ब्रेकवरून आल्यावर, अन्न तयार करण्यापूर्वी, औषधे वापरताना आणि त्यानंतर, डायपर बदलताना प्रत्येक वेळी हात स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button