breaking-newsपिंपरी / चिंचवड

अकरा वर्षाच्या ‘शाश्वत’चा सायकलीत जागतिक विश्वविक्रम

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या बालकाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्व विक्रम केला आहे.
बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात दि. 27 जानेवारीला सकाळी सहा वाजता शाश्वत याने या सायकल चालविण्यास सुरुवात केली. सायंकाळी चार वाजता शाश्वत याने हा दहा तास दहा मिनिटे व दहा सेकंदाचा विश्वविक्रम पूर्ण केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात शाश्वतचा गौरव केला. त्याच्या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (लंडन, युके) मध्ये घेण्यात आली आहे. हा विक्रम पूर्ण केल्यानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे चेअरमन डॉ. दिवाकरजी सुकूल (लंडन) व ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य वीरेंद्र शर्मा (लंडन) आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष अॅड. संतोष शुक्ला यांनी दूरध्वनीवरून त्याचे अभिनंदन केले.
हा विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे उपाध्यक्ष डॉ. आनंद भावसार, विजय तुंगार, अमोल ताकवडे यांनी प्रमाणपत्र देऊन शाश्वत शिंदेचा गौरव केला. या विश्वविक्रम सोहळ्यास उद्योजक आकाश सेंगर, सामाजिक कार्यकर्ते कुणाल मोहोळ, उद्योजक श्रीपाद कुलकर्णी, झुआरी इंडस्ट्रीजचे सर व्यवस्थापक जालिंद्र भोर, मार्केटिंग फेडरेशनचे माजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अच्युतराव सालके पाटील, ॲड. सुभाषराव देशमुख, रिलायन्स इंडस्ट्रीजचे भिवसेन तळेकर, वडगाव सहानी ता. जुन्नर येथील सरपंच खंडू शिंदे व उदयोजक रंगनाथ गावडे, मार्गदर्शक राजू भापकर आदी उपस्थित होते.
शाश्वत चंद्रशेखर शिंदे याचा जन्म 24 जून 2007 चा असून तो एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी येथे 6 वीत शिकत आहे. सायकलिंग मध्ये विश्वविक्रम करण्याचा त्याचा लहानपणापासूनचा मानस होता. शाश्वत याचे वडील चंद्रशेखर शिंदे हे मुंबई व पुणे शहरातील विख्यात आर्किटेक्ट कंपनीचे बिजनेस हेड आहेत. तर त्याची आई मनीषा चंद्रशेखर शिंदे या ऑल इंडिया आय टी असोसिएशन या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सहसचिव आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button