breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अंधेरीतील सात मजली इमारतीत भीषण आग

मुंबई – अंधेरीतील एका सात मजली रहिवासी इमारतीत भीषण आग लागली आहे. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील ‘लक्ष्मी प्लाझा’ या सात मजली इमारतीत आज सकाळी 11.11 वाजताच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यातील एका फ्लॅटला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button