breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

अंदमानमध्ये साहसी पर्यटन बेतले जिवावर, आदिवासींनी केली अमेरिकी नागरिकाची हत्या

अंदमानमध्ये साहसी पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकेतील एका पर्यटकाची आदिवासी समाजाने हत्या केली. सेंटिनेली आदिवासी जमातीने ही हत्या केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या पर्यटकाला या बेटावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी सात मच्छिमारांना अटक केली आहे.

सेंटिनेली ही अंदमान-निकोबार द्वीपकल्पातील एक जमात आहे. त्यांचा अन्य लोकांशी संपर्क नाही. पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला ६४ किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर त्यांचे वास्तव्य आहे. या बेटावर पर्यटकांना प्रवेशबंदी असते. अमेरिकेत राहणारा जॉन अॅलेन हा साहसी पर्यटनासाठी अंदमानमध्ये आला होता. सात मच्छिमारांनी जॉनला सेंटिनेली बेटाजवळ नेले होते. यादरम्यान आदिवासी जमातीने जॉनवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मच्छिमारांना जॉनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी सात मच्छिमारांना अटक केली आहे.

सेंटिनली जमातीविषयी…
नॉर्थ सेंटिनेल बेटावर सेंटिनेली आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. त्यांची लोकसंख्या १०० (२०११) असून इतर नेग्रिटी वंशाच्या लोकांप्रमाणेच ते इतिहासपूर्व काळात येथे येऊन स्थायिक झाले असावेत. ते स्वत:ची सेंटिनेलिज बोलीभाषा बोलतात. या जमातीतले पुरुष एक वैशिष्ट्यपूर्ण सालीचा कमरपट्टा वापरतात. ते कृष्णवर्णीय, मध्यम उंचीचे व नेग्रिटो वंशीय बांध्याचे आहेत. ही जंगलातील कंदमुळे गोळा करणारी शिकारी निमभटकी जमात असून ते रानडुक्कर, समुद्री कासव, मासे इत्यादींची शिकार धनुष्यबाण तसंच भाल्याने करतात. मच्छीमारीसाठी आणि समुद्री कासव पकडण्यासाठी ते होडीचा उलंडी मचवा (डोंगी होड्या) वापर करतात. डुकराचे मांस, समुद्र कासवे, भिन्न प्रकारची मच्छी, फळे, कंदमुळे हे त्यांचे अन्न असते. त्यांचा १८५८ मध्ये ब्रिटिश वसाहतवाल्यांशी संघर्ष झाला. अखेर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ब्रिटिशांनी या प्रदेशातून काढता पाय घेतला होता. या आदिवासी जमातीचा अन्य लोकांशी संपर्क नाही. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button