breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

७ राज्यांतील ५९ मतदारसंघात उद्या मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १0, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, जागांसाठी मतदान होणार आहे. तर दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. जवळपास १0 कोटी १८ लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार आहे. एकूण १ लाख १३ हजार १६७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील.

बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत. या ५९ मतदारसंघांमध्ये २0१४ साली ६४.२१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान त्यावेळी प. बंगालमध्ये (८५ टक्के) झाले होते, तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.५५ टक्के) झाले होते. त्यामुळे यंदा या जागांसाठी किती मतदान होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी या मतदारसंघांकडेही विशेष लक्ष दिल्याने निडवडणूक चुरशीची होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button