२० वर्षांची कसर मोदींनी ४ वर्षांत भरून काढली – देवेंद्र फडणवीस

मुंबई : गेल्या ४ वर्षात महाराष्ट्राला जे मिळालं, ते गेल्या २० वर्षात मिळालं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निरंजन डावखरे यांच्या भाजपा प्रवेशानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी वाढत्या इंधन दरावरही भाष्य केलं. “मागच्या काळात आपण दर कमी केला होता. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. केंद्र सरकारनं टास्क फोर्स निर्माण करुन दर कमी कसे करता येतील यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही निरंजन डावखरेंना सोबत घेतलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तरुण तडफदार नेतृत्व मिळाल्याने भाजपाला फायदा होईल. एक चांगलं नेतृत्व मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.