breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

२०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच- उद्धव ठाकरे

मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीत २०१९ साठी युती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी भेटीआधीच सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच अशी गर्जना केली आहे.

अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच असा टोला उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखामधून मारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button