Uncategorizedपिंपरी / चिंचवड

१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे

 पिंपरी – पिंपरी-चिंचवडमहापालिकेचे वर्षानुवर्षेलेखापरीक्षण न झाल्यानेआक्षेपाधीन राहिलेल्या १७०० कोटीरुपयांच्या रक्कमेचा मुद्दा स्थायीसमितीच्या सभेत बुधवारी (दि. १२) उपस्थित करण्यात आला. फायलीउपलब्ध करून न दिल्यामुळेआक्षेपाधीन रक्कमेत वाढ झाल्याचेप्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.लेखापरीक्षणासाठी कर्मचारी संख्याअपुरी असल्याचेही प्रशासनानेम्हणणे होते. प्रशासनाचे म्हणणेऐकून घेतल्यानंतर स्थायी समितीअध्यक्षा सीमा सावळे यांनी लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेल्यासर्व फायली एक महिन्याच्या आतसादर करण्याचे आदेश आयुक्तदिनेश वाघमारे यांना दिले. तसेचमुख्य लेखापरीक्षक विभागालालेखापरीक्षणासाठी आवश्यककर्मचारी तातडीने उपलब्ध करूनद्यावेत आणि वसूलपात्र रक्कमसंबंधित अधिकाऱ्यांकडून वसूलकरावेत, असे आदेशही त्यांनीआयुक्त वाघमारे यांना दिले.

समितीच्या अध्यक्षा सीमा सावळेसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना१९८२-८३ या आर्थिक वर्षांपासूनमहापालिकेचे पूर्णपणे लेखापरीक्षणझालेले नाही. त्यामुळे १७०० कोटीरुपये आक्षेपाधीन राहिले आहेत. संबंधित विभागांनी खर्च रक्कमेच्याफायली उपलब्ध करून न दिल्यामुळेही रक्कम आक्षेपाधीन राहिली आहे. यासंदर्भात मुख्या लेखा परीक्षकविभागामार्पत सर्व विभागांनावेळोवेळी लेखी कळवूनही फायलीउपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे दरवर्षी आक्षेपाधीन रक्कमेतवाढच होत चालली आहे. यामुद्द्यावर स्थायी समिती सभेत चर्चाझाली. महापालिकेचे दरवर्षीलेखापरीक्षण का होत नाही? आणिखर्च रक्कमेच्या फायली मुख्य लेखापरीक्षक विभागाला का उपलब्धकरून दिले जात नाही? असा प्रश्नस्थायीच्या अध्यक्षा सावळे यांनीसभेत उपस्थित केला.

त्यावर खुलासा करताना मुख्यलेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांनीलेखापरीक्षण आक्षेपांची पुर्तताकरण्यासाठी सर्व विभागांकडेवारंवार पाठपुरावा केला जातो, असेसांगितले. तसेच सर्व विभागांनापरिपत्रकाद्वारेही कळविले जाते, असेही त्यांनी सांगितले. तसेचकर्मचाऱ्यांची संख्या कमीअसल्यामुळे देखील महापालिकेचेलेखापरीक्षण दरवर्षी करणे शक्यहोत नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्यामुळे कर्मचारी वाढवून मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतरअधिकाऱ्यांकडून वसूल करण्यातयेणाऱ्या रक्कमेबाबतही स्थायीअध्यक्षा सावळे यांनी प्रशासनाकडेविचारणा केली. त्यावर कार्यवाहीसुरू असल्याचे प्रशासनाकडूनसांगण्यात आले.

प्रशासनाचे म्हणणे ऐकूनघेतल्यानंतर स्थायीच्या अध्यक्षासावळे यांनी लेखापरीक्षणाबाबतप्रशासन आजपर्यंत गंभीर का नव्हते? असा सवाल केला. प्रशासनाच्या याकासवगतीच्या कारभाराबाबत त्यांनीनाराजी व्यक्त केली.लेखापरीक्षणासाठी सर्व फायलीएक महिन्याच्या आत उपलब्ध करूनदेण्याचे आदेश त्यांनी आयुक्त दिनेशवाघमारे यांना दिले. अधिकाऱ्यांनीफायली उपलब्ध करून न दिल्यासत्यांना शिक्षा करण्याची कायद्याततरतूद आहे. त्याची अंमलबजावणीकरण्यासही त्यांनी आयुक्तांनासांगितले. वसुलपात्र रक्कम म्हणजेती वसूल करणे कायद्यानेबंधनकारकच आहे. त्यामुळे ज्याअधिकाऱ्यांकडून वसूलपात्र रक्कमआहे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊनघ्यावे. त्यांचे म्हणणे योग्य नसल्यासअशा अधिकाऱ्यांकडून पैसे वसूलकरावेत. तसेच मुख्य लेखापरीक्षकविभागाला लेखापरीक्षणासाठीआवश्यक असणारा कर्मचारी वर्गतातडीने उपलब्ध करून द्यावेत, असेआदेशही त्यांनी आयुक्त वाघमारेयांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button