breaking-newsमनोरंजन

हॉलिवूडमधील “आयर्न मॅन’चे चिलखत चोरीला

हॉलिवूडमध्ये 2008 साली हिट झालेल्या “आयर्न मॅन’मध्ये रॉबर्ट डावनी ज्युनिअरने परिधान केलेले आयर्न मॅन सूट अर्थात लोखंडी चिलखत चोरीला गेले आहे. लॉस एंजेलिसमधील एका गोदामामध्ये हा सूट ठेवलेला होता. तिथून तो गायब झाल्याचे उघड झाले आहे. या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान केंव्हा तरी हा आयर्न मॅन सूट चोरीला गेल्याचे या गोदामाच्या इनचार्जनी पोलिसांना सांगितले.

आयर्न मॅनची ओळख असलेल्या या सूटची अंदाजे किंमत 3,25,000 डॉलर इतकी आहे. या गोदामामधून अन्य कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे एखाद्या माहितगारानेच ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. “आयर्न मॅन’च्या सिरीजमधील “आयर्न मॅन इन्स्टॉलमेंट’ हा पहिला सिनेमा 2008 मध्ये आला होता. या फॅन्टॅसी ऍक्‍शनपटाने जगभरात 585 दशलक्ष डॉलरची कमाई केली होती.

“आयर्न मॅन 2′ 2010 साली आणि त्यानंतर “आयर्न मॅन 3′ रिलीज झाला होता. हे तिन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर हिट ठरले होते. “आयर्न मॅन’चा रोल करणाऱ्या रॉबर्ट डावनीने ज्युनिअरने अलिकडेच रिलीज झालेल्या “ऍव्हेंजर्स; इनफिनिटी वॉर’मधून पुन्हा दर्शन दिले आहे. त्याचा हा सिनेमा सध्या जगभरात तुफान हिट चालला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button