breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे
हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – एकनाथ पवार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची वतीने विक्रम पिल्ले अॅकॅडमीच्या सहकार्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी- खेळाडूंसाठी उन्हाळी सुटीनिमित्त हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 एप्रिल ते 14 मे या कालावधीत करण्यात आले आहे. शिबिर 12, 14 व 18 वर्षांखालील मुले व मुली असे सहा गटांसाठी आहे. त्यांचा शहरातील पालिका व खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी- खेळाडूंना लाभ घ्यावा, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.
शिबिर पालिकेच्या नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडियम येथे सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. सहभागी खेळाडूंना ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले अद्ययावत पद्धतीने प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार आहे. खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंसाठी 100 रूपये नाममात्र शुल्क आहे. तर, पालिकेच्या विद्यार्थ्यांना शिबिर मोफत आहे. शिबिरात सहभागी घेण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.