breaking-newsक्रिडामुंबई

हैदराबादसमोर आज चेन्नईचे सुपर आव्हान

  • क्‍वालिफायर-1 सामन्यात रंगतदार लढतीची अपेक्षा

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या मोसमातील साखळी सामन्यांची सांगता झाल्यानंतर आता प्ले-ऑफ फेरीच्या लढतींना सुरुवात झाली असून या फेरीतील आज (मंगळवार) रंगणाऱ्या पहिल्या क्‍वालिफायर-1 सामन्यात गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसमोर दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे कडवे आव्हान आहे. या दोघांमध्ये साखळीफेरीत दोन सामने झाले असून दोन्ही वेळा चेन्नईने हैदराबादचा पराभव केला आहे.

हैदराबादचा संघ आपल्या समतोल कामगिरीमुळे यंदाच्या मोसमात गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. मात्र अकेरच्या तीन सामन्यांत फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नसल्याने हैदराबादला पहिल्या सत्रातील यश कायम राखता आले नाही.त्यांच्याकडे भुवनेश्‍वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, रशीद खान व शकिब अल हसन यांच्या सारखे टी-20 मधील उत्कृष्ट गोलंदाज असतानाही प्रतिस्पर्धी संघाने गेल्या दहा सामन्यांमध्ये चारवेळा 180 पेक्षा जास्त धावा केल्या.

गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशाचा सामना करणाऱ्या हैदराबादला मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे मधल्या फळीत युसूफ पठाण, मनीष पांडे, दीपक हूडा, वृद्धिमान साहा यांसारखे खेळाडू असून यातील पांडे वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या मोसमात हैदराबचा कर्णधार केन विल्यमसन सध्या ऑरेंज कॅप मिळविण्याच्या स्पर्धेत 661 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button