हैदराबादचा कोलकातावर 13 धावांनी विजय

कोलकाता – राशिद खान, सिद्धार्थ कौल आणि कार्लोस ब्रेथवेटच्या धमाकेदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 13 धावांनी पराभव करत अंतीम सामण्यात धडाक्यात प्रवेश केला. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 174 धावा करत कोलकाता समोर 175 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना कोलकाताला निर्धारीत 20 षटकांत 9 बाद 161 धावांच करता आल्याने त्यांनी हा सामना 13 धावांनी गमावला.
सुनिल नारायण आणि ख्रिस लिन यांनी 3.2 षटकात 40 धावांची भागीदारी करत कोलकाताला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. यावेळी नारायणने भुवनेश्वर कुमारच्या षटकांत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 19 धावा वसूल केल्या. मात्र पुढच्याच षटकांत सिद्धर्थ कौलने त्याला बाद करत हि जोडी फोडली. नारायणने 13 चेंडूत 26 धावांकेल्या. त्यानंतर लिन आणि नितिश राणाने आपली धमाकेदार फलंदाजी चालूच ठेवत पॉवरप्लेच्या 6 षटकांत 67 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात राणा 22 धावा करून धावबाद झाला.
त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत 8 ते 13 या पाच षटकांमध्ये 31 रन देत कोलकाताचे 4 गडी माघारी धाडले. ज्यात नितिश राणा, ख्रिस लिन, दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा सारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. यावेळी रशीद खानने 19 धावांत 3 गडी बाद करत सामना हैदराबादच्या बाजुने झुकवला होता. त्यानंतर शुभमन गिल आणि पियुश चावला यांनी 3.3 षटकांत 27 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली होती. मात्र अखेरच्या षटकांत कार्लोस ब्रेथवेटने दोन गडी बाद करत हैदराबादला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, वृद्धिमान साहा आणि शिखर धवन यांची वेगवान सलामी आणि रशीद खानची झंझावाती खेळी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील क्वालिफायर-2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवता आले होते.
अंतिम फेरीतील स्थानासाठी निर्णायक असलेल्या या लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा फलंदजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 174 धावांची मजल मारली.
या सामन्यासाठी संघात परतलेल्या वृद्धिमान साहाने 27 चेंडूंत 5 चौकारांसह 35 धावांची खेळी करताना शिखर धवनच्या साथीत हैदराबादला 7.1 षटकांत 56 धावांची सलामी दिली. शिखर धवनने 24 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 34 धावा केल्या. परंतु कुलदीप यादवने आठव्या षटकांत शिखर धवन आणि केन विल्यमसन (3) हे दोन खंदे फलंदाज तंबूत परतविताना हैदराबादला हादरा दिला.
हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 79 धावा केल्या होत्या. वृद्धिमान साहाला बाद करून पियुष चावलाने कोलकाताला तिसरे यश लवकरच मिळवून दिले. रशीद खानने केवळ 10 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 34 धावा फटकावताना भुवनेश्वर कुमारच्या (नाबाद 5) साथीत 1.5 षटकांत 36 धावांची अखंडित भागीदारी करीत हैदराबादला 174 धावांची मजल मारून दिली.
Celebrations galore here at the Eden Gardens as the @SunRisers beat #KKR by 13 runs to enter the finals of #VIVOIPL.#Qualifier2 #VIVOIPL pic.twitter.com/tVJVD7MtKc
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2018
संक्षिप्त धावफलक-
सनरायजर्स हैदराबाद- 20 षटकांत 7 बाद 174 (रशीद खान नाबाद 34, वृद्धिमान साहा 35, शिखर धवन 34, शकिब अल हसन 28, केन विल्यमसन 3, कुलदीप यादव 29-2, सुनील नारायण 24-1, पियुष चावला 22-1) कोलकाता नाईट रायडर्स —– (ख्रिस लिन 48, सुनिल नारायण 26, नितिश राणा 22, रशिद खान 19-3)