breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हिंसक कारवायांचे पिंपरी-चिंचवडमध्ये धागेदोरे ; अक्षय प्लाझा इमारतीकडे संशयित नजरा

पिंपरी –  पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली होती. या हत्येचे धागेदोरे हिंदुत्ववादी संस्थांशी जोडले गेले. यामध्ये कर्नाटकच्या विशेष पोलीस पथकाने लंकेश हत्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला अत्यंत गुप्तपणे गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. लंकेश हत्या प्रकरणाचा पिंपरी-चिंचवडशी संबंध आल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. संशयित आरोपी अमोल काळे हा चिंचवडच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझा इमारतीत वास्तव्यास करीत असल्याने त्या इमारतीकडे संशयाच्या नजरा वाढल्या आहेत. दरम्यान, काही हिंसक कारवायांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून धागेदोरे मिळाले आहेत.

चिंचवड येथील माणिक कॉलनीजवळ पवना नदीला लागून अक्षय प्लाझा इमारतीत एकूण १९ सदनिका आहेत. पहिल्या मजल्यावरील तिसऱ्या क्रमांकाच्या सदनिकेत संशयित आरोपी अमोल काळे राहतो.  वडिलांची पिंपरीत पान टपरी आहे. इंजिनिअरिंग कंपन्यांना सुटे भाग पुरविण्याचा अमोलचा व्यवसाय आहे. पत्नी जागृती हिच्याबरोबर तो या सदनिकेत राहतो. स्वत:च्या मालकीची सदनिका आहे़ परंतु तो आजूबाजूच्या कोणाशी फारसा बोलत नाही, इतरांबरोबर मिसळत नाही. कधीतरी घरी आलाच तर एक, दोन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन येताना दिसतो. त्याच्या घराच्या दारावर श्रीगणेशाच्या चित्राचा स्टिकर चिटकविलेले आहे़ त्याखाली सनातन संस्थेचा उल्लेख आहे. सनातन संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे तेथील नागरिक सांगतात. धार्मिक ग्रंथ आणि पूजा साहित्याचे वाहन घेऊन अनेकदा या परिसरात तो आल्याचेही रहिवासी आवर्जून सांगतात. दरम्यान, बंगळुरू येथील पत्रकार लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी म्हणून त्याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर सर्वजण अक्षय प्लाझा या इमारतीकडे संशयित नजरेने पाहू लागले आहेत.

हिंसक कारवायांचे पिंपरी चिंचवडमध्ये धागेदोरे
बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. हा आरोपी चिंचवडच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझा इमारतीतील रहिवासी असल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. २९ सप्टेंबर २००८ ला नाशिक, मालेगाव येथे बॉम्ब स्फोटाची घटना घडली होती. त्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक झाली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात चिंचवड, बिजलीनगर येथील समीर कुलकर्णी यास संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. जामिनावर सुटका झालेला समीर कुलकर्णी चिंचवडच्या बिजलीनगरचा रहिवासी आहे. बॉम्ब स्फोटासारख्या हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून संशयित म्हणून पकडलेल्या समीर कुलकर्णी याच्यानंतर अशाच कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अटक केलेला काळे हा पिंपरी चिंचवडमधील दुसरा आरोपी आहे. दोघेही सनातन संस्थेचे कार्यकर्ते असल्याचे निदशार्नास आले असून पोलिसांनी तसेच तपास यंत्रणेने पिंपरी-चिंचवड परिसराकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button