breaking-newsराष्ट्रिय

‘हा तर भक्त निघाला’; मोदींच्या मुलाखतीनंतर धनंजय मुंडेंचा अक्षय कुमारला टोला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच एक मुलाखत दिली. ही मुलाखत घेतली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने. विशेष म्हणजे या मुलाखतीत राजकारणाविषयी एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. मोदींचं खासगी आयुष्य कसं आहे हे या मुलाखतीत जाणून घेण्याचा प्रयत्न अक्षयने केला. काहींनी या मुलाखतीची स्तुती केली तर काहींनी त्यावर टीकासुद्धा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर टीका केली आहे.

अक्षयच्या विविध चित्रपटांचा फोटो आणि त्यातच पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत मुंडे यांनी लिहिलं, ‘सोचता था के वो कितने मासूम थे, क्या से क्या हो गए देखते देखते.’ बॉलिवूड गाण्याच्या माध्यमातून मुंडे यांनी टोमणा मारला. ‘अरे इंटरव्यू होता की कौतुक सोहळा? आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनिअर मनोज कुमार समजत होतो हा तर भक्त निघाला..’ अशा शब्दांत त्यांनी अक्षयला चिमटा काढला.

Dhananjay Munde

@dhananjay_munde

सोचता था के वो कितने मासूम थे क्या से क्या हो गये देखते देखते…

अरे इंटरव्यू होता की कौतुक सोहळा? आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनिअर मनोज कुमार समजत होतो हा तर भक्त निघाला… 🙄 @akshaykumar

163 people are talking about this

पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button