breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येतेच असे नाही: धनंजय मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाचाळवीरपणा वाढत आहे. हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील ( कोप्रोली नाका ) सभेस संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना संघाच्या चड्डीचा उल्लेख केला होता. यावर पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, २३ तारखेला कोणाची चड्डी निघाली हे जनता बघेल. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा धनंजय मुंडे यांनी मंगळवारी समाचार घेतला. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. निवडणुकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही, असे मुंडेंनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. शरद पवारांचा नातू व अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे. त्यामुळेच उरण भागातून सर्वाधिक लीडने पार्थ पवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button