breaking-newsराष्ट्रिय

हाफिझ सईद, लखवी करतात जिहादसाठी दहशतवाद्यांची भरती…

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – हाफिझ सईद आणि झकीउर रहमान लखवी जिहादसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम करत असल्याची कबुली देण्यात आली आहे. 20 मार्च रोजी काश्‍मीरमध्ये पकडण्यात आलेल्या जैबुल्लाह नावाच्या एका दहशतवाद्याने आपल्या कबुली जबाबात ही माहिती दिली आहे. भारतीय लष्कराने 20 मार्च रोजी केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते, तर सहावा दहशतवदी-जैबुल्लाह लष्कराच्या ताब्यात जिवंत सापडला होता.

जैबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद आणि लखवी हे मुस्लिम युवकांना फूस लावून दहशतवादी बनवतात. दहशतवादी बनण्यासाठी अगदी खुले निमंत्रण देण्यात येते. 15 ते 20 वर्षे वयोगटातील पाकिस्तानी युवकांना भारताविरुद्ध जिहादमध्ये भाग घेण्यासाठी-बलिदान करण्यासाठी सामील व्हा असे आवाहन करण्यात येते. आलेल्यांचे नाव-गाव-पत्ते घेतले जातात. निवडीची प्रक्रिया काकरून, मसूल, सेक्‍टर, टाऊन, तहसील, डिस्ट्रिक्‍ट, झोनल अशा सात चढत्या टप्प्यात चालते. अखेरच्या टप्प्यासठी हाफिझ सईद जातिनिशी हजर असतो. मात्र तेथे तो हाफिज सईद म्हणून नव्हे, तर आमीर साहब किंवा आमिर-ए-मसगर नावाने ओळ्खला जातो.

मसूल नावाचे सर्वात तळातील भरती करणारे मदरशांतन मुलांची निवड्‌ करतात. जैबुल्लाचे वडील स्वत: मसूल होते. त्यांनीच जैबुल्लाला दहशतवादी बनवले.

दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी मनशेरा, डैकेन, अंबोरे, अक्‍सा, खैबर आणि मुरीदके अशी सहा केंद्रे आहेत. या केंद्रांना मसकर असे म्हणतात. प्रत्येक केंद्रावर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे लोक मदतीसाठी सज्ज असतात. केंद्रांसह खैबर पख्तुनवाच्या जंगलांमध्ये त्यांना सुमारे दोन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. नंतर दहशतवादी तयार होतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button