breaking-newsआंतरराष्टीय

हाफिझ सईदला पाकिस्तानबाहेर पाठवा – चीनचा पाकिस्तानला सल्ला

बीजिंग (चीन) – हाफिझ सईदला पाकिस्तानबाहेर पाठवण्याचा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी खाकान यांच्याबरोबर चर्चा करताना हा सल्ला दिला आहे. लष्कर ए तैयबचा सहसंस्थापक आणि जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिझ सईद मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिझ सईदच्या पाकिस्तानमधील वास्तव्यावरून आणि पाकिस्तानमधून तो करत असलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल पाकिस्तानवर सतत आंतरराष्ट्रीय दबाव येत आहे.

शी जिनपिंग आणि शाहिद अब्बास खाकनी यांच्यात झालेल्या 35 मिनिटांच्या चर्चेतील 10 मिनिटे चर्चा हाफिझ सईदला पाकिस्तानबाहेर पाठवण्याबाबत झाली, असे पंतप्रधान अब्बासी यांच्या एका सहकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. शांत जीवन जगण्यासाठी हाफिझ सईदला पश्‍चिम एशियामधील एखाद्या देशात पाठवून द्यावे असे शी जिनपिंग यांनी खाकानींना सुचवले आहे.

या संदर्भात पंतप्रधान खाकानी यांची आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत चालू असल्याचे समजते. मात्र पंतप्रधान खाकानी यांचा कार्यकाल 31 मे रोजी समाप्त होत असल्याने याबाबतीतील निर्णय आगामी सरकार घेईल असे समजले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अनेक दहशतवादी संघटना पाकिस्तानमधून कारवाया करत असल्याबाबत वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शी जिनपिंग आणि शाहिद अब्बास खाकानी यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button