हाफिज सईदला आमच्या देशात पाठवा; चीनची पाकला मागणी

बीजिंग : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानात मुक्त वावर करत आहे. भारताने वारंवार विनंती करुनही पाकिस्तानने त्याला अभय दिले आहे. दरम्यान, दहशतवादाचा मार्ग अवलंबून सर्व जगाला त्रास देणाऱ्या हाफिज सईदला आमच्या देशात पाठवा अशी मागणी चीनने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हाफिज सईदला शांततेत जगता यावे यासाठी आणि त्याने स्थलांतर केले तर आंतरराष्ट्रीय सूत्रांचे त्याच्यावरचे लक्ष कमी होईल असे चीनने पाकिस्तानला सांगितले आहे. याविषयीची माहिती द हिंदूने वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंह यांनी एप्रिल महिन्यामध्ये चीनमध्ये झालेल्या चर्चेत हे सुचवल्याचे यात म्हटले आहे.
सईदवरील सर्वांचे लक्ष बाजूला जावे यासाठी लवकरात लवकर उपाय काढा असे अब्बासी यांना चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग सांगितल्याचे अब्बासी यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितल्याचे यामध्ये म्हटले आहे. हाफिज सईद हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा नेता आहे. संयुक्त राष्ट्राने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तसेच अमेरिका व भारतानेही या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर 50 लाख डॉलर्सचे बक्षिस लावण्यात आले आहे.