स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

पिंपरी – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पहिल्या रक्तदात्या अश्विनी देसाई व श्रेया पंडीत यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजना करण्यात आले. यावेळी सदाशिव रिकामे, रत्नाकर देव, प्रदीप पाटील, अनिल खैरे, नीता जाधव, विनीता श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. भास्कर रिकामे यांनी शिबिर संयोजनाची भूमिका स्पष्ट करतानाच सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
दगडू महाकाळ यांची रक्तदानाची आजची अठ्ठावन्नावी वेळ असल्याने मंडळाच्या वतीने विनोद बन्सल यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दीपक नलावडे व दीपक पंडित यांनी या शिबिराचे संयोजन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सुजीत गोरे, वैशाली आमले यांनी विशेष परिश्रम घेतले.