breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वर्गीय आण्णासाहेब मगर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा महापालिकेला विसर

  • राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले अभिवादन
  • महापालिका प्रशासनाचा निषेध, संबंधित अधिका-यावर कारवाईची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या जातात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार स्वर्गीय आण्णासाहेब मगर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. तसेच महापालिका प्रशासनाचा राष्ट्रवादी काॅंग्रेसने निषेध व्यक्त केला. संबंधित अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.

याबाबत महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे, त्या पत्रात म्हटले की,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पिंपरी, चिंचवड, भोसरी व आकुर्डी या चार गाव एकत्र करुन कै.आण्णासाहेब मगर नगरपालिका स्थापन करत या शहराची मुर्हूतमेढ रोवली. त्यानंतर  सन १९८२ रोजी त्यांनी महानगरपालिकेची स्थापना केली. ही महानगरपालिका म्हणून झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराची झपाट्याने विकास झाला. आज या शहराची ओळख सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते. हे सर्व कै.आण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीने विचारामुळे शक्य झाले.

आज (दिनांक २६/०४/२०१९) रोजी कै. आण्णासाहेब मगर यांची १०० वी जयंती आहे.  महानगरपालिकेमार्फत सर्वच  महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या आण्णासाहेब मगरांनी या शहराची मूहूर्तमेढ रोवली, त्यांचीच १०० वी जयंती सत्ताधारी भाजप व प्रशासन कसे काय विसरले ?  कै. आण्णासाहेब मगरांची १०० व्या जयंती निमित्ताने खरे तर जयंती निमित्ताने विविध सामाजिक, प्रबोधनात्मक चार पाच दिवस कार्यक्रम ठेवले पाहिजे होते. परंतु सत्ताधारी भाजप व प्रशासनाने साधा मुख्यालयात आण्णासाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता केली नाही की साधा हार घातला नाही. हि बाब अतिशय लाजिरवाणी आहे. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर उदयास आले. त्यांच्यामुळे तुम्ही आज महापालिकेत विविध पदे भोगत आहात. त्यांनाच तुम्ही विसरले. हि बाब भाजपा सारख्या शिस्तबध्द व संस्कृतीचे रक्षक म्हणविणा-या पक्षासाठी लांछनास्पद आहे.

याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्त व जनसंपर्क अधिकारी यांना फोन करुन विचारले असता, आपणांस माहिती नाही, असे बेजबाबदार उत्तर दिले. याचा आम्ही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांच्या वतीने सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button