‘स्वराज्यरक्षक’ मालिकेसाठी कोल्हेंनी ‘घर गहाण’ ठेवल्याची अफवा असल्याचं शिवसेनेचे म्हणणं

मुंबई – महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघातील उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या घराबद्दलचा वाद चव्हाट्यावर आला आहे. जर, अमोल कोल्हेंची संपत्ती 5 कोटी रुपये आहे, तर मग त्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी त्यांनी घर गहाण ठेवल्याची अफवा असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होत. तसेच या प्रकरणावरुन कोल्हेंना ट्रोलही करण्यात आलं. मात्र, याबाबत कोल्हे समर्थकानेही पत्राद्वारे खुलासा केला आहे.
डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेचा टीआरपी वाढवा आणि मराठी मालिकेत पहिल्या क्रमांकाची ही मालिका ठरावी, यासाठी घर गहाण ठेवल्याची बातमी पेरल्याचा आरोप आढळराव पाटील समर्थक शिवसैनिकांनी केला होता. तसेच कोल्हे यांच्या संपत्तीची तपशीलवार माहिती देण्याची मागणीही पाटील समर्थकांनी केली होती.