breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

स्टेच्यू ऑफ युनिटीचे काम पूर्णत्वाकडे

मुंबई- एक प्रखर देशभक्त जो ब्रिटिश राजच्या अंतानंतर भारताच्या भूतलाववर सरदार वल्लभाई पटेल या नावाने ओळख असलेल्या                सरदार यांची जगातील 182 मीटर असाधारण उंचीची प्रतिमा गुजरामधील केवडीया, जि.नर्मदा येथे सरदार सरोवर प्रकल्पाजवळील साधूबेट द्वीपवर बनविण्यात येत  आहे. अनेक सोयीसुविधा व मनोरंजनासह असलेले हे प्रेरणादायी स्मारक  31 ऑक्टोबरला खुले होणार आहे.

विंध्य व सातपुडा पर्वतरांगेमधील नर्मदा नदीच्या किनारी हे स्मारक  तयार करण्यात येत आहे. हे स्थळ गरुडेश्वर सरदार सरोवर बांध आणि केवडिया कॉलनीच्या मध्यभागी आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य या भव्य स्मारकाची शोभा वाढविण्यात भर घालणार आहे. हे स्मारक पर्यटन व स्थानिक विकासासाठी उपयोगी ठरणार असून पर्यटकांना भूतलाववरील अद्भुत अनुभव  देणारे ठरणार आहे. या प्रतिमेच्या  500 फूट उंचीवरून एकावेळी 200 पर्यटक समायोजित सातपुडा व विंध्याचल पर्वतरांग, सरदार सरोवर व 12 किलोमीटरवरील गरुडेश्वर जलाशयाचे दर्शन करू शकणार आहे. या स्मारकार्पयत नावेनेही जवळपास तीन किलोमीटर प्रवास करून प्रवेशस्थळार्पयत येऊ शकतील. दि टेच्यू ऑफ युनिट चे प्राकृतिक व ऐतिहासिक स्वरूप आकर्षित करणारे असून ज्यात सरदार वल्लभभाई यांची ओळख पोशाख व चालतानाच्या मुद्रेमध्ये दिसणारे  आहे. या प्रतिमेची अनुमाणित क्षमता प्रतिदिन 15 हजार पर्यटकांची असणार आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक निश्चित मार्ग  करण्यात येणार असून  प्रतिदिन एकावेळी तीन हजार लोक आतील सिडीवरून अवलोकन स्थळापर्यत पोहोचू शकतील.  आतापावेतो 80 टक्के काम पूर्ण झाले असून कांस्य प्लेडिंग प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. 31 ऑक्टोबर अखेर्पयत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button