breaking-newsराष्ट्रिय

स्टरलाइट आंदोलन ; कमल हसन यांनी घेतली जखमींची भेट

चेन्नई: तुतिकोरीन येथील स्टरलाइट प्रकल्पाविरोधातील आंदोलनात जखमी झालेल्या नागरिकांची अभिनेते आणि मक्कल नीधी मय्यमचे प्रमुख कमल हसन यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तुतिकोरीन येथील स्टरलाइट या तांबेनिर्मिती प्रकल्पाविरोधात आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.

काही जखमींना तुतिकोरीन येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींची विचारपूस करण्यासाठी कमल हसन आज रुग्णालयात गेले. त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. ‘आमची अवस्था काय केली आहे, ते येऊन बघा, ‘ असे रुग्णांनी हसन यांना सांगितले.

‘आंदोलक ग्रामस्थांवर गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले हे आम्हाला ठाऊक आहे. आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केवळ नुकसान भरपाई देऊन प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार हा प्रकल्प बंद करण्यात यावा,’ अशी मागणीही कमल हसन यांनी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button