सौदी अरबमधील हॉटेलच्या टॉयलेटमध्ये भारतीय पायलटचा मृतदेह

रियाध (सौदी अरब) –सौदी अरबची राजधानी रियाधमधील हॉटेलच्या टॉयलेटमध्ये एका भारतीय पायलटचा मृतदेह आढळला आहे. एयर इंडियाच्या या पायलटची ओळख पटली असून ऋत्विक तिवारी (27) असे त्याचे नाव सांगण्यात आले आहे. हॉलिडे इन नावाच्या हॉटेलच्या जिम मधील टॉयलेटमध्ये ऋत्विक तिवारीचा हार्ट ऍटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ऋत्विकचा सहकारी कॅप्टन रेणू माऊलेने मृतदेहाची ओळख पटवली.
ऋतिक तिवारी याच्या मृत्यूची माहिती रियाधमधील भारतीय दूतावासाला देण्यात आली आहे. ऋत्विकच्या मृत्यूचे हार्ट ऍटेक असे कारण देण्यात आले असले, तरी त्या बाबतीत हॉस्पिटलचा अहवाल अद्याप मिळायचा आहे.
भारतीय दूतावासाचे अधिकारी पायलट ऋत्विक तिवारी यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे समाज कल्याणचे समूपदेशक अनिल नौटियाल यांनी सांगितले आहे. दूतावासाची मंजूरी मिळाल्यानंतर तिवारी यांचा मृतदेह भारतात आणण्यात येईल असे एयर लाइन्सच्या व्यवस्थापकांनी सांगितले.