breaking-newsताज्या घडामोडी
सोसायट्यांची पाणी बिले त्वरीत माफ करावीत, मच्छिंद्र तापकीर यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पाणी कपात जाहीर केली आहे. परंतु, गेल्या कित्येक महिन्यांपासून सोसायट्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. सोसाट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना तापकीर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात महापालिकेने पाणी कपात जाहीर केली आहे. परंतु, त्या आधीपासूनच अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तापकीर यांनी केली आहे.