breaking-newsपुणे

सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करून पैशांची मागणी करणा-या आरोपीस अटक

 महिलांचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करून त्यांच्या अकाउंटवरून अश्लील मेसेज पोस्ट करायचा. टाकलेल्या पोस्ट डिलीट करण्यासाठी संबंधितांकडून पैशांची मागणी करणा-या आरोपीला सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी पिंपळे सौदागर भागातील एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा बळीराम फड (रा. जगदीश खानावळ चाळ, खानावळकर आली, पनवेल, जि. रायगड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा याने फिर्यादी महिलेचे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक इत्यादी सोशल मीडिया अकाउंट हॅक केले. त्यावरून अश्लील व बदनामीकारक मेसेज पोस्ट केले. पोस्ट करण्यात आलेले मेसेज काढण्यासाठी त्याने फिर्यादी महिलेकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास हे अकाउंट बंद न करता त्यावर आणखी बदनामीकारक मेसेज टाकण्याची धमकी दिली. महिलेने तक्रार दिल्यानंतर पुणे सायबर क्राईम पोलिसांनी कसून तपास करत कृष्णाला अटक केली. कृष्णाकडे कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या ओळखीच्या आणखी सहा मुलींचे अकाउंट हॅक करून त्यावरून बदनामीकारक मेसेज पोस्ट करून त्यांच्याकडेही पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कृष्णाला अटक करून त्याला सांगवी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्याने ज्या मुलींच्या अकाऊंटवरून बदनामीकारक मेसेज पोस्ट केले आहेत, त्यांना देखील संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी पुणे शहर सायबर क्राईम पोलिसांकडे 606 तक्रारी अर्ज आले होते. तर 2018 या वर्षात आजवर 189 तक्रारी अर्ज आले आहेत. अशाप्रकारे महिलांची बदनामी, अश्लील मेसेज पोस्ट करण्याचे प्रकार घडल्यास तसेच पैशांची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ सायबर क्राईम सेल पुणे शहर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर क्राईम पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार, मंदा नेवसे, महिला पोलीस शिपाई उमा पालवे, ज्योती दिवाणे, पोलीस शिपाई शाहरुख शेख, योगेश वाव्हळ यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button