‘सोनु तुला मायावर भरसो नाय का?’ या प्रश्नाने तरुणाईला लावलं वेड !

हल्ली सोशलमीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. ‘शांताबाई’, ‘बाबुराव आला’ या लोकगितानंतर आता “सोनु तुला मायावर भरसो नाय का ?’ या गाण्याने एकच धुमाकूळ घातलाय. युट्यूब, व्हाॅट्सअॅपवर या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.
सोन तुला मायावर भरसो नाय का? या गाण्याने अवघ्या सोशल मीडियाकर्मींना वेड लावलाय. जो तो “सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय…नाय काय… सोनूची माय कशी ढेपशी ढेपशी ढेपशी ले आवडते पेप्सी पेप्सी पेप्सीचा आकार कसा गोल गोल सोनू तू मायाशी गोड बोल गोड बोल… सोनू तूला माझ्यावर भरोसा नाही काय…” असं म्हणत ग्रुपने व्हिडिओ काढून युट्यूबवर अपलोड करतोय. बरं हे इथंच थांबत नाही. तर गुजराथी, हिंदी, पंजाबी, भोजपुरी भाषांमध्येही हे गाणं पाहायला मिळतंय.
कसं तयार झालं हे गाणं ?
खरंतर हे एक लोकगीत आहे. ज्या प्रकारे शांताबाई होतं तसंच हे गीत आहे. हे गाणं अजय क्षीरसागर यांनी लिहिलंय, गायलं आणि संगीतही दिलंय. त्यांच्यासोबत या गाण्यात ‘सोनु तुला माझ्यावर भरसो नाय का?’ हे कडवं गायलं त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी.. हे गाणं अजय क्षीरसागर यांचा भाऊ अविनाश अवघडे यांने एक व्हाॅटस्अॅप क्लिप पाठवली होती. त्यावर अजय यांनी हे गाणं तयार केलं. या गाण्याला चंदन कांबळे यांनी संगीत दिलं. युट्यूबवर या गाण्याला 5 लाखांहुन अधिक व्हिव्यूज मिळाले आहे. याआधीही ‘मी तुझा परश्या आणि तू माझी आर्ची’ हे गाणंही अजय क्षीरसागर यांचं लोकप्रिय झालं होतं.
अलीकडेच आरजे मलिष्काने गाण्याचं विडंबन करत मुंबई, ‘तुला बीएमसीवर भरसो नाय का?’ अशी पोलखोल मुंबई पालिकेची केली. मुंबई पालिकेवर टीका केल्यामुळे शिवसेनेनं मलिष्काला चांगलं टार्गेट केलंय. हा झाला वादाचा प्रश्न…
पण, काही असो सद्धा तरुणाईला या गाण्याने चांगलीच भुरळ घातलीये. सोसायटी असो, मित्रांचा ग्रुप असो सगळीकडे या गाण्याची एकच धूम आहे.