सोनम कपूरवर भाड्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ

लग्नाच्या नंतर सोनम कपूर एवढी बिझी आहे की तिला श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नसावी. लग्नाला पाच दिवस झाल्यावर सोनम लगेचच कान फिल्मफेस्टिव्हलला रवाना झाली होती. तेथून आल्यावर ती लगेचच “वीरे दी वेडिंग’ या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामाला लागली आहे. तिकडे पतीदेव आनंद आहुजा लंडनला गेलेले. तो आल्यावर सोनम विमानतळावर त्याला घेण्यासाठी पोहोचली. या काळात ती स्वतःसाठी नवीन घरही शोधते आहे. सोनम आणि आनंद आहुजा लंडनमध्येच राहणार असे समजले होते.
सध्या तरी सोनम जुहूला मम्मी पप्पांकडेच राहते आहे. सोनम आणि आनंदचे नवीन घर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बांधून तयार होते आहे. तोपर्यंत तिला राहण्यासाठी जवळपास एक घर पाहिजे आहे. लंडनमध्ये आनंदने एक घर खरेदी केलेले आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी तात्पुरता मुक्काम करण्यासाठी तिला भाड्याच्या घराचाच आधार घ्यावा लागणार आहे.
अद्याप आहुजा कुटुंबियांकडून या नवदाम्पत्याच्या राहण्यासाठी घराची व्यवस्था झालेली नाही, असे समजते आहे. सोनमच्या लग्नापूर्वीच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील घराचे काम पूर्ण होणार असे समजले होते. मात्र ते का अडखळले आहे, ते माहित नाही.