breaking-newsराष्ट्रिय

सेल्समध्ये १ कोटी तरुणांना नोकरीच्या संधी

मुंबई : जगातील सर्वात मोठी बाजारपेठ व जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असलेल्या भारतात येणारा काळ हा विक्री क्षेत्राचा असेल. या पार्श्वभूमीवर कामगार कायद्यात १० प्रमुख बदल केल्यास देशात येत्या तीन वर्षांत विक्री क्षेत्रात तब्बल १ कोटी नोकऱ्या निर्माण होतील, असे मत टीमलीज सर्व्हिसेसच्या सह संस्थापिका व कार्यकारी उपाध्यक्ष रितूपर्णा चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

नोकऱ्यांसंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या ‘टीमलीज’ने नुकतेच ‘सेल्स’ श्रेणीतील नोकऱ्यांचे सर्वेक्षण केले. या अहवालात म्हटले आहे की, विविध ४४ कामगार कायद्यांचे चार प्रकारच्या कामगार नियमावलीत रूपांतर करणे, युनिक व्यवसाय क्रमांक, कर्मचाऱ्यांंना वेतनश्रेणी निवडीची सोय देणे, कारखाने सुधारणा विधेयक, कंत्राटी कामगार कायद्यात सुधारणा, असे दहा बदल केल्यास भविष्यात १ कोटी नोकऱ्या सहज उपलब्ध होऊ शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button