breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सेगमेंट जुळणीसाठी आणखी दोन ‘लॉचिंग मशिन’ बसविणार

पिंपरी :  पुणे मेट्रोचे खराळवाडीत एकूण 8 पिलरवर सेगमेंट जुळणी पूर्ण झाली आहे. त्यावर लोहमार्ग (ट्रॅक), ओव्हर हेड वायर, रेलिंग (सुरक्षा कठडे) व सिग्नलचे काम केले जाणार आहे. आणखी दोन ‘लॉचिंग मशिन’ टप्प्या-टप्प्याने मार्गावर बसविण्यात येऊन सेगमेंट जुळणीचे काम वेगात पूर्ण करण्याचे महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे नियोजन आहे.
गेल्या तीन महिन्यात खराळवाडी येथील 8 पिलरमध्ये सेगमेंट जुळणी पुर्ण झाली आहे. महिन्याभरात 3 जागी सेगमेंट जुळणी झाली आहे. जुलैअखेरपर्यंत शंकरवाडीपर्यंतच्या सर्व पिलरवर सेगमेंट जुळणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यात साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरासाठी आणखी दोन ‘लॉचिंग मशिन’ आणून सेगमेंट जुळणीचे काम केले जाणार आहे. दुसरे मशिन जूनला तर तिसरे मशिन ऑगस्टमध्ये लावले जाईल.  सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत सेगमेंट जुळणी झाल्यानंतर ट्रॅक, ओव्हर हेड वायर, रेलिंग व सिग्नलचे काम केले जाणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रीक विभाग तैनात आहे. ट्रॅकच्या जुळणीसाठी ‘भीम’ बनवून ते स्क्रूने (बीएलटी) जोडले जातील.
मेट्रो मार्गिकेस अडथळा ठरणारी झाडे काढण्यासाठी त्यांची छायाचित्रे सादर करून  पालिकेची परवानगीनेच त्या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. ग्रेडसेपरेटरमधून मेट्रो घेता येत नसल्याने ती पिंपरी व मोरवाडी चौकात सर्व्हिस लेनवरून घेण्यात येत आहे. पालिका अधिकार्‍यांसोबत चर्चा करूनच मार्गाची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खडकी कॅन्टोन्मेंट भागातील जागेसंदर्भात संरक्षण खात्याकडे अंतिम टप्प्यात चर्चा आहे. येत्या 10 दिवसांमध्ये जागेसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होईल, असे टप्पा दोनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे सांगितले.
दरम्यान, पिंपरी ते रेंजहिल्स मार्गावरील आतापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रोमध्ये एकूण 126 फाउंडेशन पूर्ण, 76 पिलर तयार, 33 पिलर अर्ध्यावर तयार, एकूण 43 पिलरला कॅप, सेगमेंट लॉचिंग 8 पिलरवर, एकूण 524 सेगमेंट कॉस्टिंग.  संत तुकारामनगर, फुगेवाडी, व बोपोडी मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button