मनोरंजन

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लस झालेत स्वस्त!

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस या दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले होते. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनचे मूल्य ५७,९०० रूपये होते. आता हे मॉडेल ४७,९९० रूपयात मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हा ६४,९०० रूपये मूल्य असणारा स्मार्टफोन आता ग्राहकांना ५३,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. तर १२८ जीबी स्टोअरेज असणारे सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लसचे व्हेरियंट आता ७०,९०० रूपयांऐवजी ग्राहकांना ६४,९०० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कडांचा वापर न करता मोठ्या डिस्प्लेचा वापर करता येतो. गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स वॉटर आणि डस्टप्रुफ आहेत. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर असून तो आधीच्या मॉडेलपेक्षा १० टक्के अधिक गतीमान असणार आहे. दोन्ही मॉडेल्सची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. तर गॅलेक्सी एस ८ प्लसमध्ये ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंटदेखील आहे.  या दोन्ही मॉडेलमध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.

याशिवाय यात फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा आहेत. याच्या मदतीने कुणीही गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेल्सला लॉक/अनलॉक करू शकतो. याशिवाय यात सॅमसंग पास या नावाचे पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप असून याच्या मदतीने विविध अ‍ॅप्सच्या पासवर्डचे अधिक चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करता येते. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे ३००० आणि ३५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्‍या प्रदान करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button