पिंपरी / चिंचवड

सुहास हळदणकर खून प्रकरणाच्या निषेधार्थ खराळवाडीत ‘कॅन्डल मार्च’

पिंपरी : सुहास हळदणकर या सामाजिक कार्यकर्त्याच्या खूनाच्या निषेधार्थ रविवारी (दि. 16) खराळवाडीत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी गुन्ह्यातील आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली. यामध्ये परिसरातील चारशे नागरिक सहभागी झाले होते.

खराळाई देवीच्या मंदीरापासून मोर्चाला सुरुवात झाली. चौदणी चौक, रेवाळे चौक मार्गे आंबेडकर चौकतून सुहास हळदणकर याच्या खरावाडीतील घराजवळ श्रद्धांजली वाहून मोर्चाची सांगता करण्यात आली.

खराळवाडीतील सामाजिक कार्यकर्ता सुहास हळदणकरचा बारा जणांच्या टोळक्याने खून केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी बाराजणांना अटक केली आहे. याप्रकरणानंतर खराळवाडीमध्ये मुकमोर्चा काढून आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी पोलिसांना निवेदनही देण्यात आले होते. तसेच सुहासची बहिण श्वेता हळदणकरने पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button