breaking-newsराष्ट्रिय

सुरक्षिततेच्या कारणास्तव ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड बदला

नवी दिल्ली- फेसबुकचा डाटा लिक झाल्यानंतर खबरदारी आणि अन्य सुरक्षिततेच्या कारणास्तव सोशल नेटवर्किंगची साईट ट्विटरने जगभरातील 22 कोटी युजर्सना आपला पासवर्ड बदलण्याचे संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्‌वीट करून हा संदेश देण्यात आला आहे.

कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने आम्ही आमच्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्याचे आवाहन करतो आहोत. यावर आम्ही उपाययोजना केल्या आहेत. आत्तापर्यंत एकाही ट्‌विटर अकाऊंटचा गैरवापर झाला नसून तशी तक्रारही आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सनी त्यांचा स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा, असे आम्ही सुचवत आहोत.

मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्‌विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्‍यक ती खबरदारी घेतो आहोत, असेही ट्‌विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सध्याच्या घडीला ट्‌विटर या सोशल नेटवर्किंग साइटचे जगभरात 330 दशलक्ष युजर्स आहेत. या सगळ्यांनाच पासवर्ड बदलण्याचे आवाहन ट्‌विटरने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button