breaking-newsआंतरराष्टीय

सुटकेसाठी भारतीय दूतावासाकडून प्रयत्न सुरू

काबूल : मिनीबसमधून सरकारी उर्जा प्रकल्पाकडे जात असताना, या भारतीय इंजिनिअरचे अपहरण करण्यात आले असे भारतीय दूतावासातातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे सर्व इंजिनिअर “दा अफगाणिस्तान ब्रेस्ना शेरकत’ (डीएबीएस) या पॉवर जनरेटिंग स्टेशन हाताळणाऱ्या प्रकल्पावर काम करत होते.

या अपहरणकर्त्यांची काय मागणी आहे किंवा त्यांनी खंडणीची मागणी केली आहे का, याबाबतचा तपशीलही अद्याप मिळू शकलेला नाही.

परराष्ट्र मंत्रालयाकडून या अपहरणाविषयी अफगाणिस्तान सरकारशी संपर्क साधला असून अपहरणकर्त्यांबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये रहिवासी असलेल्या आणि कामासाठी तेथे गेलेल्या भारतीयांना केंद्र सरकारकडून वारंवार सुरक्षिततेचे इशारे दिले जात असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button