breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सीपीएम अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना आकारणार शुल्क

– वैद्यकीय अधिका-यांना मिळणार सवलत

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन (सीपीएस) या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, यापुढे महापालिका खासगी रुग्णालयाप्रमाणे वायसीएम रुग्णालयातील सीपीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांत तब्बल 9 लाख रुपये शुल्क आकारणार आहे, त्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापैार राहूल जाधव होते.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 1998 पासून कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन, मुंबई (सीपीएस) यांच्यामार्फत दोन वर्षांचा सीपीएस अभ्यासक्रम चालविला जातो. वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन, मुंबई यांच्या मार्फत वायसीएम रुग्णालयात प्रवेश दिला जातो. हा प्रवेश घेऊन दोन वर्षे वायसीएमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांकडून महापालिकेकडून अद्याप कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, याच अभ्यासक्रमासाठी खासगी रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क घेतले जाते. तसेच, कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन, मुंबई यांनी सीपीएस प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकरणी करण्याचे नमूद केले आहे.

त्याप्रमाणे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार समिती गठीत करून शुल्क निश्चिती करण्यात आली. खासगी रुग्णालये व इतर संस्थांकडून या अभ्यासक्रमासाठी 9 ते 10 लाख रुपये शुल्क आकारले जाते. तर, या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे मानधन, प्रशिक्षणासाठी नेमलेले वैद्यकीय अधिकारी व इतर कारणांसाठी मिळून प्रति विद्यार्थी एकूण 7 लाख 84 हजार 800 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार सीपीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून प्रति वर्षी 4 लाख 50 हजार याप्रमाणे दोन वर्षांसाठी 9 लाख रुपये घेण्यात यावे. तसा निर्णय घेतला असून त्याला महासभेने मंजूरी दिली आहे.

वैद्यकीय अधिका-यांना मिळणार सवलत
महापालिका यापुढे सीपीएस विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांसाठी 9 लाख रुपये आकारणार आहे. परंतु, पालिका रुग्णालयातील आस्थापनेवरील डॉक्टरांना यात सवलत मिळेल. त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकारणी केली जाणार नाही, परंतु त्यांचा पाच वर्षांसाठी नऊ लाखांचा बॉण्ड लिहून घेण्यात येणार आहे. तसे या प्रस्ताव नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button