सीआयडीकडून राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

पुणे – कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत. या तिन्ही आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.
सन्मान मोर्चामध्ये राहुल फटांगळेच्या आईचा आक्रोश – कोरेगाव-भीमा आणि परिसरात झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे (वय ३० वर्ष) तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलची हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्हिडीओ फुटेज, मोबाइल कॉल रेकॉर्ड, मोबाइल ड्रम डाटा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील तिघांना अटक केली होती. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असा दावा पोलिसांनी केला होता.