breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
सीआयएसएफचा जवान ठरला देवदूत, वाचवले प्रवाशाचे प्राण

मुंबई :- मुंबई विमानतळावर एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला, मात्र त्याचवेळी सीआयएसएफच्या एका जवानाने धावून जात या प्रवाशाचे प्राण वाचवले. ही घटना २६ ऑक्टोबरची असून त्यासंदर्भातले सीसीटीव्ही फुटेज ANI या वृत्तसंस्थेने पोस्ट केले आहे. मुंबईच्या आंतरदेशीय विमातळावर सीआयएसएफच्या जवानांकडून प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तपासणीच्या काऊंटरजवळच कोसळला. त्यावेळी सीआयएसएफच्या जवानाने तातडीने या प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली आणि कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन अर्थात CPR दिला. मोहीत कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्याने देवदूत बनूनच प्रवाशाचे प्राण वाचवले. या प्रवाशाला नंतर नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता या प्रवाशाची प्रकृती ठीक आहे असेही समजते आहे.