breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीत सिलिंडर दरवाढीचा कॉंग्रेसतर्फे निषेध

पिंपरी – गॅस सिलिंडर दरवाढीस जबाबदार असणा-या केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 2) निषेध करण्यात आला. सिलिंडरचे प्रतिकात्मक पूजन करण्यात आले. तसेच महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झाले. या आंदोलनात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रदेश कॉंग्रेस सदस्य संग्राम तावडे, महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा, प्रदेश महिला सचिव बिंदू तिवारी, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जयस्वाल, विष्णुपंत नेवाळे, शाम आगरवाल, परशुराम गुंजाळ, शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण रुपनर, मकरध्वज यादव, अनिरुध्द कांबळे, गौरव चौधरी, तुषार पाटील, विनिता तिवारी, संगिता कळसकर, तारिक रिजवी, बाबा बनसोडे, रहिम सय्यद, राजन नायर आदी सहभागी झाले होते.
महागाईस जबाबदार असलेल्या भाजप सरकारचा निषेध करीत शहराध्यक्ष साठे म्हणाले की, पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वाढत आहे. पेट्रोल लवकरच लिटरला 100 रुपये होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व वाहतूकीचे दर एसटीचे दरासह इतर भाव वाढणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. यातून वाहतूक खर्च वाढल्यामुळे देखील शेती मालाचे भाव वाढणार आहेत. त्याचा फटका सर्व जनतेला बसणार आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव रुपयाच्या पति वाढवून अवघा एक पैसा दर कमी करुन देशभरातील जनतेची मोदींनी थट्टा केली आहे. हेच का अच्छे दिन असा सवाल साठे यांनी उपस्थित केला.