breaking-newsराष्ट्रिय
सिंधीया हाऊसमधल्या दस्तऐवजांसंदर्भात सीबीडीटीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – मुंबईतील आयकर विभागाच्या सिंधीया हाऊसमधले निरव मोदी/मेहूल चोक्सी प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज आणि नोंदी आगीत नष्ट झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र ते पूर्णपणे खोटे आणि आधारहीन असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे.
निरव मोदी/मेहूल चोक्सी प्रकरणाशी संबंधित सर्व नोंदी/दस्तऐवज इतर इमारतीमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कागदपत्र नष्ट झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.