breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सावधान! चुकीचा करपरतावा भरल्यास होईल शिक्षा

नवी दिल्ली: आयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न) भरताना तुम्ही एक जरी चूक केलीत, तरी तुम्हाला ती जड जाऊ शकते. शिवाय जर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही चुकीचा आयकर परतावा भरण्याचा विचार करत आहात, तरीही सावध व्हा. पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाइल न करण्याबाबत आयकर विभागाने सावध केलं आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत कळवले जाणार आहे.
आयकर विभागाने करदात्यांना आपल्या आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवणे किंवा कपात वाढवून दाखवणे यासारख्या क्लृप्त्या करण्यापासून सावध केले आहे. आयकर विभागाच्या बेंगळुरू येथील मध्यवर्ती कार्यालयामार्फत करदात्यांना यासंदर्भात सूचनाही जारी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की गैरफायद्यासाठी बनावट करसल्लागारांच्या जाळ्यात अडकू नका. परताव्यात उत्पन्न कमी दाखवणे किंवा कपात वाढवून दाखवणे असे प्रकार नियमांनुसार दंडनीय आहेत आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.
जानेवारी महिन्यात आयकर विभागाच्या तपास यंत्रणेने बनावट आयकर परतावे भरून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी सीबीआयने अलीकडेच गुन्हाही दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button