breaking-newsमनोरंजन
साराला मिळाला आणखी एक बिग बजेट चित्रपट

अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानला आणखी एक बिग बजेट चित्रपट मिळाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटात साराची निवड झाली आहे. या निवडीमागे सैफचा मोठा हात असल्याचे समजते.
एका मुलाखतीत सैफ म्हणाला, केदारनाथ चित्रपटाचा वाद सर्वांसमोर आला होता, तेव्हा मी चिंतेत होतो. साराला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये, यासाठीच प्रयत्न करत होतो. तसेच सराला ‘सिम्बा’ चित्रपट मिळावा, यासाठीही धडपडत होतो, असेही तो म्हणाला.