breaking-newsराष्ट्रिय
सात तामिळी मच्छिमारांना श्रीलंकेने पकडले

रामेश्वरम – तामिळनाडुतील सात मच्छिमारांना श्रीलंका नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याचे वृत्त आहे. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप ठेऊन त्यांना पकडण्यात आले आहे. हे मच्छिमार तंजाऊर जिल्ह्यातील आहेत. काल रात्री ते आपल्या नावा घेऊन नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेले होते.
नेबुनथीऊ जवळ मासेमारी करीत असताना त्यांना श्रीलंका नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पकडून नेले अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. श्रीलंका नौदल अधिकाऱ्यांनी त्यांची जहाजे या भारतीय मच्छिमारांच्या नावांवर नेऊन धडकवली त्यात या नावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नेमके कोठे नेण्यात आले आहे याचीही माहिती श्रीलंकेच्या नौदलाने अजून दिलेली नाही. त्याविषयी श्रीलंकेशी संपर्क साधला जात आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले.