सागरमाला कार्यक्रमांतर्गत 200 प्रकल्प निश्चित

नवी दिल्ली – देशातील बंदरे परस्परांशी जोडण्याच्या उद्देशाने राबविल्या जात असलेल्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्चाचे सुमारे दोनशे प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. यात 112 रस्ते प्रकल्प, 70 रेल्वे प्रकल्प, 11 अंतर्गत जलमार्ग प्रकल्प, 3 पाईपलाईन प्रकल्प आणि 15 बहुपर्यायी लॉजिस्टीक पार्कसचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय रेल्वे, रस्ते आणि महामार्ग मंत्रालय, देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण अशा विविध संस्था हे प्रकल्प राबवित आहेत.
महाराष्ट्रात जालना, वर्धा, सांगली आणि नाशिक येथे जेएनपीटीमार्फत 4 बहु पर्यायी लॉजिस्टीक्स पार्कस विकसित केली जात आहेत. तसेच पुणे, सातारा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी ही ठिकाणे रस्ते किंवा रेल्वेमार्गाने बंदरांशी जोडली जात आहेत. असे नौवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.