breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवी पोलीस ठाण्यावर मटका मोर्चा

पिंपरी – शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्याचा आरोप करत अपना वतन संघटनेने आज (शनिवारी) सांगवी पोलीस ठाण्यावर ‘मटका मोर्चा’ काढला. अवैद्यधंदे बंद करण्याची मागणी केली.

पिंपळेगुरव येथील काटेपुरम चौकातून शनिवारी सकाळी मोर्चाला सुरुवात करण्यात आली.  अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाने सांगवी ठाण्यावर धडक मारली.  सिद्दीक शेख म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी, अवैधधंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. या अवैध धंद्यांपासून महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शहरातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अशी मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button