पिंपरी / चिंचवड

सांगवी, पिंपळे-गुरवमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट – राजेंद्र जगताप

पिंपरी :  सांगवी-पिंपळे गुरवमध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकार्‍यांना वरिष्ठ भाजप नेत्यांचा धाक दाखवून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवली जात असल्याचा आरोप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे. तसेच अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत जगताप यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी-पिंपळे गुरवमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. ही अनधिकृत बांधकामे सन 2007 ते 2012 या कालावधीत झाली असून तत्कालीन नगरसेवकांनी त्या संदर्भात योग्य ती कारवाई करणे आवश्यक होते. तसा निर्णय त्यांनी घेतला असता तर आज जी सांगवी-पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती झाली नसती.

सांगवी, पिंपळे-गुरव परिसरात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. भाजपाची सत्ता आल्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपाचा पाठिंबा आहे की काय? अशी शंकाही जगताप यांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्या प्रभागात पुन्हा अनधिकृत बांधकामे जोमाने सुरु आहेत. यामागे उच्च पदावरील नेते आणि त्यांचे सहकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही, राजेंद्र जगताप यांनी केला आहे.

गेल्या महिन्यात प्रशासनाच्यावतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे नाटक करण्यात आले. केवळ औपचारिकता म्हणून ही कारवाई केली. प्रामाणिकपणे मिळकतकर भरणार्‍यांना महापालिकेच्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकाम धारकांवर करून अनधिकृतपणे देण्यात येणारे नळजोड बंद करावेत, अशी मागणीही राजेंद्र जगताप यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button