Mahaenews

सांगलीत सरपंचाची घराशेजारीच निर्घृण हत्या

Share On

सांगली : सांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या सुमारास घराशेजारीच हत्या झाली.

अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी घरासमोरच असलेल्या युवराज पाटील यांच्या मान आणि डोक्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

युवराज पाटील हे शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे बंधू आहेत. युवराज पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारीही होते. युवराज पाटील यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

दरम्यान या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.

Exit mobile version