breaking-newsआंतरराष्टीय

सहमती नव्हतीच, अकबर यांनी बलात्कारच केला-पल्लवी गोगोई

पल्लवी गोगोई यांनी एम. जे अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला. आरोपांवर स्पष्टीकरण देताना एम जे अकबर यांनी मात्र आपल्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीने होते अशी कबुली दिली. मात्र हे आरोपही खोडून काढत पुन्हा एकदा पल्लवी गोगोईने ट्विट करत सहमती नव्हती तो बलात्कारच होता असे म्हटले आहे. बळाचा आणि पदाचा गैरवापर करत एम. जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला असे पल्लवी गोगोई यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मी एशियन एजमध्ये काम करत असताना एम जे अकबर यांनी माझा शारिरीक, मानसिक छळ केला. ते मला शिव्याही द्यायचे असाही आरोप पल्लवी गोगोईंनी केला. त्यांनी माझ्यावर बलात्कार केला हे सत्य ते नाकारत आहेत. सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते अशी कबुली त्यांनी दिली मात्र त्यात काहीही तथ्य नाही. मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. एम. जे अकबर यांनी पदाचा गैरवापर करून माझ्यावर बलात्कारच केला हे मी कालही म्हटले होते आणि आजही तेच म्हणते आहे. मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर आणि सोशल मीडियावर जे मांडले आहे त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे.

एम. जे. अकबर यांचा अनुभव ज्या ज्या महिलांना आला आहे त्या सगळ्या महिलांनी पुढे यावं आणि बोलावं असं मी आवाहन करते. कारण या माणसाचा खरा चेहेरा समाजाला समजलाच पाहिजे असेही पल्लवी गोगोईंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आरोपानंतर एम जे अकबर काय म्हटले होते?
एम जे अकबर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘1994 च्या आसपास मी आणि पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या. इतकंच नाही तर माझ्या कुटुंबातही कलह निर्माण झाला. परस्पर संमतीने ठेवलेले हे संबंध नंतर संपवण्यात आले’.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button