सस्ता पेट्रोल महंगा पानी-पेट्रोल 67 पैसे, तर पाणी 35 रु. लिटर

कारकोस (व्हेनेन्ज्युएला) – पेट्रोलचे सतत वाढणारे दर ही आजची एक ज्वलंत समस्या आहे. आजच्या काळात कोठे तरी पेट्रोल 67 पैसे लिटर दराने मिळते असे सांगितले, तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण व्हेनेझुएला हा जगातील एकमेव देश आहे, जेथे पाण्यापेक्षाही पेट्रोल स्वस्त आहे. व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल मिळते 0.67 रुपये, म्हणजे 67 पैसे लिटर. आणि पाणी मिळते 35 रुपये लिटर दराने. म्हणजे पाणी पेट्रोलपेक्षा 35 पटीने महाग आहे. भारतात शनिवारी पेट्रोल 86 रुपये लिटर, तर डिझेल 73 रुपये होते. जगात आईसलॅंडमध्ये पेट्रोल सर्वात महाग, म्हणजे 145 रु. लिटर आहे.
संपूर्ण जगात पेट्रोलचे सर्वाधिक साठे व्हेनेझुुएलामध्येच आहेत. सौदी अरब दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक स्थिती बिघडलेली असूनही व्हेनेझुएलाचे सरकार इंधनावर सबसिडी देते. त्यामुळेच पेट्रोल इतके स्वस्त आहे. इराणमध्ये पेट्रोलचा दर 18.88 रु. / लिटर आहे, तर कुवैतमध्ये 23.59 होता.
एक मोठा तेलउत्पादक देश असूनही नॉर्वेमध्ये पेट्रोल महाग आहे. नार्वेमध्ये पेट्रोलचा दर 138.20 रु./लिटर असण्यामागेही काही तरी कारण आहे. तेलाची निर्यात करून मिळालेल्या पैशाने सरकार आपल्या देशाचा विकास साधत असते.