breaking-newsपुणे

ससूनमधून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

पुणे- ससून सर्वोपचार रुग्णालयातून एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक लोणारे (27) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. मुख्यालयातील गार्डसोबत तो ससून रुग्णालय आला होता. रविवारी सकाळी त्याने हातातील बेड्या काढून पळ काढला. गुन्ह्यामध्ये लोणारे हा येरवडा कारागृहात होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. पोलिसांच्या निगराणीखाली असतानाच त्याने पळ काढल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते तपास करत आहेत.

अक्षय लोणारे याच्यावर 2015 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, त्याची मानसिक परिस्थिती बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या बंदोबस्तासाठी चार पोलीस कर्मचारी होते. सकाळी साडेआठच्या दरम्यान यातील दोघे चहा प्यायला तर एक वॉशरुमला गेला होता. एक पोलीस कर्मचारी मात्र, त्याच्याजवळ होता. या कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधत लोणारे याने बेडीतून हात काढून पळ काढला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button