breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘सल्तनत चली गई, फिर भी सुलतानो की तरह बर्ताव’, जयराम रमेश

कोची – काँग्रेससमोर सध्या राजकीय नाही तर अस्तित्वाचं संकट उभं आहे असं वक्तव्य करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे समोर आलेल्या नव्या आव्हानांशी लढा देण्यासाठी सर्व नेत्यांनी येऊन एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. सोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी लढा द्यायचा असेल तर हलकेपणाने घेणं सोडलं पाहिजे असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला आहे. आपली काम करण्याच्या पद्दतीत लवचिकता आणण्याची काँग्रेसला गरज असल्याचा सल्लाही त्यांनी स्वपक्षाला दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी तिखट शब्दांत काँग्रेसला सुनावलं आहे.

‘हो काँग्रेस खूप मोठ्या संकटाला सामोरं जात आहे’, अशी कबुलीच जयराम रमेश यांनी दिली आहे. काही नेते अजूनही सत्तेत असल्याप्रमाणे वागतात असा प्रश्न विचारला असता, ‘संस्थानं खालसा झाली, पण राजेशाही काही गेलेली नाही. आम्ही अजूनही राजे असल्याप्रमाणेच वागतो. आम्हाला पुर्णपणे बदलण्याची गरज आहे’, असा टोला लगावला.

‘काँग्रेसला वागण्यात, बोलण्यात, संवाद साधण्याच्या पद्दतीत बदल करण्याची गरज आहे. मला वाटतं लोक अजूनही काँग्रेसला पाठिंबा देतात, पण त्यांना नवा काँग्रेस पक्ष पाहायचा आहे. त्यांना त्या जुन्या घोषणा, जुनी विचारपद्धती नको आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे’,  असं जयराम रमेश बोलले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘काँग्रेसने 1996 ते 2004 दरम्यान सत्तेत नसताना राजकीय संकटाचा सामना केला आहे. त्याआधी 1977 साली आणीबाणीनंतर पार पडलेल्या निवडणुकीनंतरही काँग्रेससमोर राजकीय संकट उभं राहिलं होतं. पण आज काँग्रेसमोर वेगळं संकट उभं राहिलं असून ते अस्तित्व टिकवण्यासाठीचं आहे. हे राजकीय संकट नाही. पक्ष खूप मोठ्या संकटात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button